कल्याणच्या दहिसर गावात राहणारे मदन नायकवडी यांनी एका दुकानातून तीन अंडी विकत घेतली होती. घरी येऊन ती फोडल्यानंतर एका अंड्यात प्लास्टिक सदृश्य पदार्थाचा थर दिसून आल्याचं नायकवडी यांचं म्हणणं आहे. तसंच या अंड्यापासून केलेल्या ऑमलेटची चव आणि वासही वेगळा येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नायकवडी यांनी केली.
तर मंगळवारी अमेय गोखले या ग्राहकानं 2 अंडी खरेदी केली. मात्र, ऑम्लेट करताना त्याला नेहमीसारखा वास आला नाही. त्याचबरोबर अंड्याच्या टरफलातून प्लास्टिकचा दोराही निघाल्याचं त्याचं म्हणणं आहे.
प्लास्टिकची अंडी ओळखायची कशी?
- प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग हा जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी बनलेला असतो. याच रसायनांनी अंड्यांचा बाहेरील भाग बनवला जात असल्याचीही शक्यता आहे.
- प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो.
- बनावट अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ तव्यावर टाकल्यास तो तसाच राहतो. साधारण अंड्यांच्या पिवळ्या पदार्थासारखा तव्यावर पसरत नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत प्लास्टिकच्या अंडी विक्रीचे प्रकार उघड होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप होत आहे.
संबंधित बातम्या
कोलकाता, चेन्नई पाठोपाठ डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी?
PHOTO: प्लॅस्टिकची अंडी ओळखायची कशी?
कोलकात्यामध्ये प्लास्टिकच्या अंड्यांची विक्री