पुढच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने या कासवाची त्या पायाची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. त्यामुळे कासव चालू किंवा पाण्यात पोहूही शकत नव्हतं. यावेळी शुश्रूषा केंद्रात कासवावर पशुवैद्यकांनी फिजिओथेरपीद्वारे विविध व्यायाम करुन घेतले.
केंद्रातील डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी या कासवाच्या पिल्लावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान कासवाच्या पायाला शेक देऊन, विविध व्यायाम करुन, हालचाल न होणाऱ्या पायाला कार्यान्वित करण्यात आलं.
या केंद्रात असा प्रयोग पहिल्यांदाच झाला असून एका कासवाला पुन्हा त्यांनी चार पायांवर चालायला आणि पोहायला तयार केलं आहे. आता या कासवाला पुढील दोन आठवड्यात पुन्हा समुद्रात सोडलं जाणार आहे.