Mumbai Corona Update :  मुंबईत कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत असताना कालपासून यात किंचित वाढ होत आहे. आज मुंबईत 50 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. काल 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 28 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 290 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.





राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  964 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 110  रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात  72  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही


राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,875  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 92, 74,099  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.