मुंबई: मुंबईतल्या आर्थर कारागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी यांची चांगलीच दोस्ती जमल्याचं समजतं आहे. कारागृहात गेल्यापासून छगन भुजबळ आणि पीटर मुखर्जी यांच्यात चांगलीच गट्टी जमली आहे.


 

विशेष म्हणजे भुजबळांना अद्याप घराच्या जेवणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भुजबळांना पीटर मुखर्जी यांच्याच डब्याचाच आधार मिळतो आहे. आर्थर कारागृहाच्या १२ क्रमांकाच्या बराकीत भुजबळांची रवानगी करण्यात आली आहे.

 

यामध्ये ७ ते ८ कैदी असून त्यात पीटर मुखर्जी, अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात कैदेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचाही समावेश आहे. विशेष रंजक गोष्ट म्हणजे, भुजबळ मंत्रीपदी असताना त्यांनी आर्थर कारागृहात स्पेशल सेल उभारण्याचे आदेश दिले होते. त्या सेलमध्ये याआधी दहशतवादी कसाबला ठेवलं होतं. त्यानंतर ती सेल विविध बराकींमध्ये विभागली गेली. त्यापैकी १२ क्रमांकाच्या बराकीत सध्या भुजबळ कोठडीत आहेत.