मुंबई: राज्यात आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर मुंबई हायकोर्टाने आज चांगलेच ताशेरे ओढले आहेत.


 

पाण्याची नासाडी करु नका, क्रिकेट सामन्यांपेक्षा माणसं जास्त महत्वाची असल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलंय. दुष्काळी परिस्थितीत सामने राज्याबाहेर का नेत नाहीत असा परखड सावलही कोर्टाने एमसीएला विचारला आहे.

 

आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी पाण्याच्या गैरवापराबद्दल आपली चिंता व्यक्त केली. यावर उत्तर देताना एमसीएच्या वकिलांनी सामन्यांच्या दरम्यान वापरलं जाणारं पाणी हे पिण्याचं पाणी नसल्याचं सांगितलं. पण या उत्तरावर कोर्टाचं समाधान झालं नाही.

 

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपुरात आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होणार असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

उद्या दुपारी 3 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.