मुंबई : मुंबई महापालिकेच्या पाच हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांचं रजिस्ट्रेशन ऑनलाइन होणार आहे. हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक वेगळं बारकोड कार्डही दिलं जाणार आहे.


पहिल्या टप्प्यात मुंबईतील केईएम, भाभा, राजावाडी, जोगेश्वरी ट्रामा सेंटर, कस्तूरबा या पाच हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्था आता ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या रुग्णाची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. तसंच पेशंटचे सर्व रिपोर्ट , औषधं यांची माहितीही यात असेल.

सध्या पालिका हॉस्पिटलमध्ये पेशंटला उपचार घेताना आपले पेपर घ्यावे लागतात. या ऑनलाइन सिस्टिममुळे एका क्लिकवर रुग्णाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी पालिका 70 कोटी रुपयेही खर्च करणार आहे.