ठाणे: देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठा मोर्चाने आता नवी मागणी केली आहे. ठाण्यातील तीन हात नाका चौकाचं नामकरण 'मराठा क्रांती चौक' करा अशी मागणी करण्यात आली आहे.


मराठा मोर्चा आयोजकांनी त्याबाबतचं पत्र महापौरांना दिलं आहे.

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी, अट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठा आरक्षण या मागण्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघत आहेत. ठाण्यातही 16 ऑक्टोबरला मराठा मोर्चा निघाला होता.



या मोर्चातही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने हजेरी लावली होती.

"शिस्तबद्ध मराठा मोर्चाने ऐतिहासिक नोंद केली होती. त्याचीच आठवण म्हणून तीन हात नाका चौकाचं नामकरण 'मराठा क्रांती चौक' " करा अशी मागणी मराठा मोर्चा आयोजकांनी केली आहे.