Omicron Variant in Mumbai : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधुक पुन्हा वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात या पार्श्वभूमीवर सरकारकडून तयारीला वेग आला आहे. दुसरीकडे मुंबईत आफ्रिकेतून 87 जण आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली असून या सर्वांना ट्रेसिंग करण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. यातील डोंबिवलीमधील दोघे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र या दोघांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं आहेत की नाही याची टेस्ट अद्याप बाकी आहे. 



महापौरांनी सांगितलं की,  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे. कोविड सेंटर सज्ज आहेत आता ते पुन्हा ॲक्टिव्ह करावे लागणार आहेत. डॉक्टर , नर्स स्टाफ आपल्याकडे आहेत.  एअरपोर्टबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं ते म्हणाले. बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुंबियांची चाचणी केली जाईल, असंही त्या म्हणाल्या.


Omicron Variant : ओमिक्रॉननं धाकधुक वाढवली; जग सतर्क, काय आहेत लक्षणं?


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 


ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकन देशांतून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.


महाराष्ट्रही सतर्क 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (omicron variant covid) दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे. आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक देखील बोलावली आहे. तसेच मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे.   त्यांचबरोबर या  देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असणार आहे. प्रत्येक आठ दिवसानंतर आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच देशाअंतर्गतविमान प्रवास करणाऱ्याना देखील 48 तासांच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र अवश्यक असणार आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :