Mumbai Best Bus Travel : बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून बेस्ट प्रवासासाठी लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दक्षिण आफिक्रेच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने खबरदारी घेत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकलनंतर आता बेस्टमध्येही प्रवास करायचा असल्याचं लस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलं आहे. लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच बेस्ट बसमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आलं आहे.
लोकल रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मास्कसह प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर बेस्ट प्रवाशनानेही लसीकरण सक्तीचं केलं आहे. त्यामुळे आजपासून बेस्टमध्ये प्रवास करायचा असल्यास लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवा.
बेस्ट प्रशासनाने सांगितलं की, 'मुंबईत अनेक ठिकाणी बस सुरु होण्याआधीच प्रवाशांना तिकिट दिलं जातं. तिकिट देताना आजपासून लसीकरण प्रमाणपत्र पाहिलं जाईल. प्रत्येकाला कोविन अॅपवर आपलं लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. '
ओमिक्रॉनचं संकट! राज्यात पुन्हा काही निर्बंध? आज तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता -
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याआधी 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यात 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे..
रुमाल म्हणजे मास्क नाही, रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास 500 रुपयांचा दंड लागणार; राज्य सरकारची नवी नियमावली -
लसीकरण न केलेल्या प्रवाशांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच