कल्याणः अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसीतील 142 कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश प्रदूषण मंडळानं दिले आहेत.

 

प्रदूषण मंडळानं 142 कंपन्यांना तशा नोटीसही बजावल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये डोंबिवलिती 86 तर अंबरनाथमधील 56 कंपन्यांचा समावेश आहे.