मुंबई: 'नाशिक महापालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली करा, किंवा माझा राजीनामा घ्या.' अशी टोकाची भूमिका गिरीश महाजनांनी घेतल्यानेच गेडामांची उचलबांगडी केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
येत्या काही महिन्यात नाशिक पालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजनांवर आहे. विशेष म्हणजे गेले 20 महिने गेडाम यांनी नियमांवर बोट धरुन काम सुरु केलं आहे. त्यातच बिल्डरांना कपाट प्रकरणात गेडामांनी हैराण केलं.
अनधिकृत बांधकामांविरोधात मोर्चा उघडला. नियम डावलून बांधकामांना परवानगी देणं बंद केलं. यामुळं बिल्डर लॉबी दुखावली होती आणि याच लॉबीचे सहानुभुतीदार असलेल्या महाजनांनी मग गेडामांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं कळतं आहे.