वसई-विरार : वसई-विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. म्हासवन पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे वसई-विरारवासियांवर ही वेळ आली आहे.

 
पालघरमध्ये म्हासवन येथे सुर्या नदीला पूर आल्यामुळे म्हासवन पम्पिंग स्टेशन येथील सर्व पंप बंद करण्यात आले आहेत. जॅकव्हिलमध्ये पुन्हा गाळ जमा झाला असल्याने पंप चोकअप होऊन कमी पाणी पुरवठा करत आहेत.

 
पर्यायाने वसई-विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुर्णपणे बंद आहे. मागील बारा तासात वसई-विरार क्षेत्रात 116 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.