मुंबई : मुंबई आणि परिसरातल्या उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर काहीशी उसंत घेतली आहे. मात्र तरीही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.


 
शनिवार संध्याकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. सालाबादप्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल, घाटकोपर आणि अंधेरीच्या काही भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली पाहायाला मिळाली. रात्रभरात काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झालाय.

 
मुंबईत कुठल्याही स्थितीत पाणी साचू देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांनी दिलं होतं. हिंदमाताजवळ पाणी साचू नये म्हणून 108 कोटी रुपये खर्चून पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं. त्यानंतर 15 मिनिटापेक्षा जास्त काळ पाणी रस्त्यावर राहणार नाही असं पालिका आयुक्तांनी म्हटलं होतं, पण धुवांधार पावसानं सगळे दावे फोल ठरले आहेत.