ठाणे : ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांकडे वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिले. ठाणे शहर पोलिसांचं हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी वाचल्यानंतर त्यांनी ठाणे पोलिसांना विनम्रता आणि उत्तर देण्याची पद्धत योग्य शब्दात शिकवली. उत्तर सांगण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे सांगत, उत्तर कसं असायला हवं, हेही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहर पोलिसांना सांगून चांगलीच चपराक दिली आहे.


 

मुंबईसह ठाण्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. कामावरुन घरी परतण्याच्या वेळेस झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/749255117564579840

वाहतूक कोंडीची तक्रार अनेकजण ट्विटरच्या माध्यमातून करताना दिसतात. अशाचप्रकारे ठाण्यातील @DpsS9  या ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांच्या @ThaneCityPolice या ट्विटर हँडलला टॅग करुन वाहतूक कोंडीची समस्या सांगितली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी 'हे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतं. त्यामुळे त्यांना कळवा.' अशाप्रकारे रिप्लाय दिला. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहर पोलिसांना चांगलंच खडसावलं.

https://twitter.com/ThaneCityPolice/status/749267207159361536

"हे क्षेत्र ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतं आणि आम्ही त्यांना या तक्रारीबाबत कळवू." असे तुमचे उत्तर असायला हवं, असं ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिसांच्या ट्वीटला रिप्लाय दिला.

https://twitter.com/ThaneCityPolice/status/749267644902027264

त्यानंतर ठाणे पोलिसांनी नमतं घेत मुख्यमंत्र्यांचा ट्वीटला पुन्हा रिप्लाय दिला, "प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही संबंधित विभागांना कळवतो. या प्रकरणातही कळवलं आहे. पण तक्रारदाराला कसा रिप्लाय द्यावा, हे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. धन्यवाद सर."