मुंबई : ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी त्यांचा योग्य सन्मान न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. कोणतही राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, आजपर्यंत कोणत्याही सरकारने मला योग्य मान दिला नाही. मी उत्तर प्रदेशचा आहे, पण त्या सरकारनेही आजपर्यंत मला सन्मानित केलं नाही. मी गेल्या 50 वर्षांपासून मुंबईत आहे, पण महाराष्ट्र सरकारने देखील कोणताही आदर दिला नसल्याची खंत अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटर वर व्यक्त केली.
फिल्मफेअरचे वरिष्ठ सहाय्यक संपादक रघुवेंद्रसिंग यांनी अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरवर काही प्रश्न विचारले होते. आपलं अभिनयात मोठं योगदान आहे. विशेषकरुन रामायनात. मात्र, तुमचा योग्य सन्मान झाला नसल्याचा प्रश्न रघुवेंद्रसिंग यांनी विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरा कोणत्याही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने माझा उचित सन्मान केला नसल्याची खंत अरुण गोविल यांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूंपासून देशाला वाचवण्यासाठी सरकारने देशभरात मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. मात्र, या दिवसात लोकांचे मन रमावे यासाठी लोकाग्रहास्तव ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शन या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.
फेक अकाऊंटमुळे त्रस्त
रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे सोशल मीडियावरील त्यांच्या फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत. ‘दूरदर्शन’वर ‘रामायण’ मालिका सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या नावाचे अनेक फेक अकाउंट असल्याचं समोर आलं आहे. याबाबत दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर रिपोर्ट करुन अनेक यातील बरेच फेक अकाउंट बंद केले आहेत.
Sanitizer Tunnel | सॅनिटायझर टनेलविषयी पुण्यातील 4 शास्त्रज्ञांचं संशोधन, दहा दिवस स्वत:वरच केला प्रयोग