मुंबई : राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला असल्याचेही त्यांनी सांगितले.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी काही माध्यमात बातम्या आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. मात्र, अद्याप लॉकाडाऊन वाढवण्यासंबंधी निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे, अशा ठिकाणी जिल्ह्याच्या पूर्णपणे सीमा बंद करून काही अतिशय महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे.


केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट


राज्यात 512 कंटेनमेन्ट झोन आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तरी हॉटस्पॉट झोनबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याच्या घरातल्या सर्वांना हाइड्रोक्लोरोक्वीन (एचसीक्यू) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरळी, धारावी अशा परिसरासाठी निर्णय घेण्यात आले आहे. झोपडपट्टीच्या भागासाठी संस्थात्मक अलगीकरण देण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडून 7 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची तयारी देखील राज्य सरकारने दाखवल्याचे त्यांनी सांगितले.


Coronavirus | पोलीस बाप ड्युटीवर, नवजात बाळाचं लांबूनच दर्शन, खबरदारीसाठी कुशीतही घेऊ शकत नाही!


राज्यासाठी दिलासा
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात डबलिंग रेट हा तीन दिवसांवरुन सातवर गेला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिल्या आहेत.


Plasma Therapy | पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता - आरोग्य मंत्री राजेश टोपे