मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे लोक पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर टोल माफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

यासंदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र, सरकारकडून उत्तर आलेलं नाही.

 

दरम्यान, 25 ऑगस्टपर्यंत सरकारकडून उत्तर आलं नाही, तर 26 ऑगस्टपासून मी स्वतः वाहनं टोल फ्री सोडेन, असा इशारा राणे यांनी दिला आहे.