NIA Raids On PFI : जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया (PFI-Popular Front of India) विरोधात राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) ने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईतील विक्रोळी येथे पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी एनआयएच्या पथक पोहोचलं असून छापेमारी सुरु आहे.


मुंबईच्या विक्रोळीत एनआयएची छापेमारी


पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी पहाटेच्या सुमारास एनआयएचं पथक पोहोचलं आहे. मात्र, वाहिद शेख हे दरवाजा उघडत नव्हता, जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहिदने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होतं. त्यानंतर पाच ते सहा तासानंतर वाहिदने दरवाजा उघडला आणि एनआयएच्या पथकाला घरामध्ये घेतलं. त्यानंतर आता छापेमारी सुरु आहे.


Mumbai Vikroli NIA Raids : पाहा व्हिडीओ



महाराष्ट्रासह देशभरात 20 ठिकाणी छापेमारी


पीएफआय संबंधित ठिकाणी एनआयएकडून मुंबईतील विक्रोळीसह नवी मुंबई, ठाणे येथील भिवंडीमध्येही एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरात सुमारे 20 ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया (PFI) विरोधात कारवाई करत देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत छापेमारी केली आहे. PFI संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


NIA ची PFI विरोधात मोठी कारवाई


दहशतवादविरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत (UAPA) गेल्या वर्षी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, केस क्रमांक 31/2022 अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. हे प्रकरण पीएफआय, संबंधित नेते आणि कार्यकर्ते, हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असण्याच्या संबंधांवरून ही छापेमारी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने पाटण्याच्या फुलवारी शरीफ परिसरात जमले होते, अशी माहिती एनआयएला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.