Amol Mitkari on BJP : काल पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला. चार राज्यांमध्ये भाजपनं आपली सत्ता मिळवली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुन्हा भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. या विजयानंतर पुन्हा देशात भाजपची आणि पंतप्रधान मोदींची लाट कायम असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. मिटकरींनी आकड्यांचं गणित सादर करत भाजपची कुठलीही लाट नसल्याचं म्हटलं आहे.
मिटकरींनी सादर केलेली आकडेवारी अशी
29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे
भाजपकडे सिक्कीममध्ये 0 जागा मिझोराममध्ये 0 जागा तामिळनाडूमध्ये 0 जागा आहे.
भाजपकडे जागा आहेत:-
आंध्रप्रदेश मध्ये 175 पैकी 4
केरळमध्ये 140 पैकी 1
पंजाबमध्ये 117 पैकी 3
बंगालमध्ये 294 पैकी 3
तेलंगणात 119 पैकी 5
दिल्लीत 70 पैकी ८
ओरिसात 147 पैकी 10
नागालँडमध्ये 60 पैकी 12
ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तिथे भाजपच्या जागांची स्थिती
मेघालयात 60 पैकी 2
बिहारमध्ये 243 पैकी 53
जम्मू काश्मिरमध्ये 87 पैकी 25
गोव्यात 40 पैकी 13 जागा
देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा
देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :