मुंबई : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवार) पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारी 1 वाजता विधीमंडळाच्या परिसरात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोण-कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून कोणते नेते शपथ घेऊ शकतात याची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे.


शिवसेनेने आपल्या मंत्र्यांची अंतिम यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना न्याय दिला आहे. शिवसेनेकडून तीन अपक्ष आमदारांची मंत्रीपदासाठी निवड केली आहे. यामध्ये शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नेवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख, अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. अब्दुल सत्तारांना लॉटरी लागली असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळणार आहे. शिवसेनेने दिग्गज नेत्यांना डावलून आठ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.


शिवसेनेकडून हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

अनिल परब
उदय सामंत
गुलाबराव पाटील
शंभूराजे देसाई
दादा भुसे
संजय राठोड
अब्दुल सत्तार
राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळचे अपक्ष आमदार
शंकरराव गडाख , नेवासा चे अपक्ष आमदार
बच्चू कडू, अचलपूरचे अपक्ष आमदार
संदीपान भुमरे

काँग्रेसमधून हे नेते शपथ घेणार

के.सी.पाडवी
अशोक चव्हाण
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
विजय वड्डेटीवार
सुनील केदार
अस्लम शेख
वर्षा गायकवाड
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजित कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेऊ शकतात

अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ
जितेंद्र आव्हाड
नवाब मलिक
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे
दत्ता भरणे
अदिती तटकरे
संजय बनसोडे

कुणाला किती मंत्रिपदं मिळणार? 

शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील, असं बोललं जात आहेत.