देवेंद्र फडणवीस यांना टारगेट केलं जात असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिली होती. अॅक्सिस बँकेतून वळत्या केल्या जाणाऱ्या खात्यांबद्दलही त्यांनी भाष्य केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्यांवर परिणाम होत असेल तर शांत बसणार नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - अॅक्सिस बँकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता, पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याची शक्यता
अॅक्सिस बँकेतील खाती वळवण्यावरुन वाद -
नव्या सरकारने बँकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बॅकेकडे वळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र, हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात, अशी माहिती मुंबई मिरर वृत्तपत्रात छापून आली आहे. विशेष म्हणजे हा घटनाक्रम शिवसेना आणि अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्धानंतर घडला आहे. उद्या ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्यानंतर ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतून पोलिसांची खाती वळवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उप-संचालक पदावर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी केला आहे. यासंबंधीची तक्रारही त्यांनी ईडीकडे दाखल केली होती.
हेही वाचा - वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलेल्या वाक्यांवरुन राजकारण, भिंतीवर 'यूटी वाईट' असा उल्लेख
Amruta Fadanvis | वाईट नेता मिळणं ही राज्याची चूक नाही, अमृता फडणवीसांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा | ABP Majha