Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आर्यन खान प्रकरणात खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. पंरतु आज मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडेंना तात्पुरता दिलासा दिला. 8 जूनपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे समीर वानखेडे यांना सोशल मीडिया धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच  दिल्ली एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी खोटे आरोप पसरवत असून त्यामुळे समीर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमकीचे संदेश येत असल्याचा दावा देखील वानखेडे यांनी या पत्रात केला आहे. तसेच सोशल मीडियावरुन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वांरवार अश्लील आणि धमकीचे मेसेज येत असल्याचा उल्लेख समीर वानखेडे यांनी या पत्रात केला आहे. तसेच धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी समीर वानखेडे यांनी केली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना ते पत्र मिळाले असून ते योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


समीर वानखेडे यांना न्यायालयाचा दिलासा


न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर समीर वानखेडे यांच्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सीबीआयने वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद देखील कोर्टाने मान्य केला आहे. तसेच समीर वानखेडे यांना सोशल मीडिया ट्रायल होऊ नये यासाठी कठोर नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपासणासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास समीर वानखेडे यांनी कोर्टाने मनाई केली आहे. तसेच आता समीर वानखेडे यांच्यावरील पुढील सुनावणी 8 मे रोजी पुन्हा पार पडणार आहे. 


एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईविरोधात वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी 19 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने वानखेडेंना 22 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शनिवार-रविवारी वानखेडे यांची सलग दोन दिवस पाच तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांची गेल्या दोन दिवसांत सीबीआयने सलग पाच तास चौकशी केली आहे. तसेच हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यासाठी समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या दोन दिवसांच्या चौकशीचे अहवाल सीबीआयने कोर्टात सादर केले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nashik NCP : '50 खोके, ईडी ओके', 'भाजप हटाओ लोकशाही बचाओ'; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन