Aryan Khan Drugs case : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मुदतवाढ मिळणार का?, यावर कोर्ट गुरूवारी फैसला देणार आहे. याप्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीचा तपास सुरू असल्यानं आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनडीपीएस कोर्टाकडे करण्यात आली आहे. एनसीबीतर्फे अॅड. अद्वैत सेठना यांनी याप्रकरणी बुधवारी युक्तिवाद केला. एनडीपीएस कायद्यातील कलम 36A(4) प्रमाणे 180 दिवस संपायच्या अधीच ही मुदतवाढ मागण्यात आलीय, येत्य शनिवारी ही मुदत संपणार आहे. याप्रकरणी एसीबीनं शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यापैकी 18 सध्या जामीनावर असून तस्करीच्या आरोपात अटक झालेले दोन परदेशी नागरीक अद्याप जेेलमध्येच आहेत.


मुंबई सत्र न्यायालयातील एनडीपीएस कोर्टातील युक्तिवाद पूर्ण, उद्या फैसला


तपासयंत्रणेनं याप्रकरणी जमा केलेले सर्व नमुने तपासणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ज्यातील सर्व 17 नमुने सायकोट्रॉपिक ड्रग चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ तपास योग्य मार्गानं सुरू आहे, यात एकूण 69 साक्षीदारांचा जावाब आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. 10 स्वतंत्र साक्षीदारांचा जावाब ही नोंदवला गेला असून अन्य 4 जणांचा जबाब नोंदवणं अद्याप बाकी आहे. याशिवाय 19 संशयितांचा जावाब नोंदविण्यात आला असून अन्य 15  संशयितांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी एनसीबीतर्फे करण्यात आलीय. मात्र याला या प्रकरणात अजूनही न्यायालयीन कोठडीत असलेले दोन आरोपी अब्दुल कदल शेख आणि चॅनेडू इगवे यांच्यावतीनं विरोध करण्यात आला. कारण आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना जामीन मिळणं कठीण आहे.


एसआयटीचा तपास अद्याप सुरू असल्यानं हवी 90 दिवसांची मुदतवाढ


मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि या तपासाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडेंविरोधात जोरदार आरोपांची मोहीम सुरू केली होती. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोपही झाले. या प्रकरणावरून एकूणच एनसीबीच्या कार्यपद्धतीवरही अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. त्यामुळे नाईलाजानं या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्लीतील विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला. याच प्रकरणाचा परिणाम म्हणून समीर वानखेडे यांना एनसीबीकडनं मुदतवाढही नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. तर नवाब मलिक यांनाही ईडीनं एका प्रकरणात अटक केली असून ते सध्या आर्थर रोड कारगृहात आहेत.


महत्वाच्या बातम्या


DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला


यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निर्बंधमुक्त साजरी करा; गुडीपाडवा सण निर्बंधमुक्तीबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?


Rajesh Tope : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत राजेश टोपे यांची पत्रकार परिषद, काय म्हणाले आरोग्यमंत्री?