Navratri 2022 : नवरात्रीचा (Navratri) आज पहिला दिवस. आज घटस्थापना (Ghatsthapana) असल्यामुळे मुंबईतील (Mumbai) दादरचे फूल मार्केट (Dadar Flower Market) ग्राहकांनी गजबजून गेले आहे. मात्र मार्केटवर राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा (Rain) मोठा परिणाम दिसतो आहे. तसेच प्लास्टिकच्या फुलांचाही फटका मार्केटला बसलेला आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी नवरात्री साजरी होत असल्याने मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गर्दी देखील आहे, मात्र मालाची आवक प्रचंड घसरलेली आहे. जी फुले येत आहेत ती भिजलेली असल्याने व्यापारी नाराज आहेत, ग्राहक आहेत, पण चांगला माल नाही अशी स्थिती आहे.


दुसरीकडे मार्केटमध्ये फुलांच्या दरात फारसे बदल झालेले दिसत नाही. फुलांचे दरही सामान्य आहेत. झेंडू 50 ते 80 रुपये किलो, अष्टर 80 रुपये किलो, शेवंती 60 ते 120 रुपये किलो, गुलछडी 240 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर ज्यांची आज मागणी जास्त आहे त्या वेण्या 160 ते 200 रुपये डझन दराने आज मार्केटमध्ये आहेत. भिजलेला माल मार्केटमध्ये आल्यामुळे फुलांना सुक्या फुलांच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नाही. शिवाय बाजारातील प्लास्टिकच्या फुलांचाही फटका बसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. 


नवरात्रोत्सवाला सुरुवात
शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पवित्र उत्सवाची सुरुवात आज (26 सप्टेंबर) घटस्थापनेने होणार आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव आहे. या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या विविध अशा नऊ रुपांची पूजा करण्यात येते. या काळात नऊ दिवस भाविक मनोभावे देवीची पूजा करतात आणि त्यासोबतच उपवास देखील करतात. या काळात अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येते. 


नवरात्रोत्सव पावसात जाणार?
राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव पावसात जाण्याची शक्यता आहे. 






Dadar Phool Market Navratri : नवरात्रीचा पहिला दिवस, दादर फूल मार्केटमध्ये काय आहेत फुलांचे दर?