नवी मुंबई : मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव मारहाण प्रकरणी भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर याच्यासह त्याच्या 9 साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी 29 तारखेला रात्री प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणार हल्ला करत जबर मारहाण केली होती.


अलिबाग सत्र न्यायालयाने न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्याने अटकेच्या भीतीने नगरसेवक चिपळेकर सह 9 जण अलिबागमधून फरार झाले आहेत. या सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी कामोठे पोलिसांचं पथक अलिबागमध्ये दाखल झालं आहे.


प्रशांत जाधव या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रशांत जाधव यांची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या गुंडांना आवरावे, अन्यथा आमची वेळ येईल, असा इशारा बाळा नांदगावकर दिला होता.