Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये एका रासायनिक कंपनीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली होती. तब्बल आठ तासानंतर ही आग आटोक्यात आली. जवळपास सहा कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत आर्थिक नुकसान तर झालेच. पण तीन जणांचा होरपळून मृत्यू झालाय. आघीच्या घटनेनंतर चौकशी समती नेमली जाणार आहे. आगीत मृत्यू झालेल्यांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. घरातील एकूलता एक कमवता गेल्यामुळे कुटुंब रस्त्यावर आलेय. चौकशी समिती नेमल्यानंतर चूक कुणाची हे कदाचीत समोर येईल.. पण या कुटुंबाचं काय? असा प्रश्न कायम राहणार आहे.  


कल्याण डोंबिवली येथे राहणारा निखील पाशीलकर हा घरातील एकूलता एक कमवता मुलगा कुटूंबाने गमावला. रबर कंपणीत काम करणाऱ्या निखीलचा दुर्देवी मृत्यू झाला. वेळेत अग्निशमनच्या गाड्या न पोचल्याने तिघांचा बळी गेला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. याची चौकशी होणार असल्याचे औद्योगीक सुरक्षा संचालक आणि लेबर कमीश्नर यांनी स्पष्ट केलय.


निखील पाशीलकर हा कुटूंबातील एकमेक कमवता होता.  तो मागील सहा वर्षांपासून रबर कंपंनीत काम करतोय. शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने निखील दुसऱ्या मजल्यावर अडकला. आग लागून जवळपास एक तास झाला तरी अग्निशमन गाड्या घटनास्थळी न आल्याने निखिलला बाहेर पडता आले नाही. दीड तास तो कुटूंबाच्या संपर्कात होता. मात्र अखेर त्याचा यात मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार एमआयडीसीचे अधिकारी असल्याचा आरोप निखिलच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
केमिकल कंपणी मध्ये लागलेली आग विझविण्यासाठी घटनास्थळी येण्यास एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपा अग्निशमन विभागाला उशीर झाला होता. पाणी आणि फोम ची वेळेत उपलब्धता न झाल्याने आग भडकून सहा कंपण्या जळून खाक झाल्य. तर तीन कामगारांचा मृत्यू झाला. यामुळे याची सर्व चौकशी केली जाईल असे औद्योगीक सुरक्षा विभाग संचालक सुरेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दरम्यान आपण घटनास्थळी वेळेत पोचलो असलो तरी तेवढा कर्मचारीवर्ग आणि गाड्या उपलब्ध नसल्याची कबूली एमआयडीसी अग्निशमन विभागाचे अधिकारी आर बी पाटील यांनी दिली आहे.