नवी मुंबई: आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, सर्वपक्षीय नगरसेवकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

तुकाराम मुंढे यांना नवी मुंबई महापालिकेत येण्यास मज्जाव करावा, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलिसांत म्हटलं आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर

दरम्यान आज नवी मुंबई पालिकेत आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी मंजूर झाला.

या अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने मतदान केलं. तर भाजपने तुकाराम मुंढे यांच्या बाजूने मतदान केलं.

तुकाराम मुंढेंवरील आरोप

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

सामान्य नागरिक तुकाराम मुंढेंच्या पाठिशी

असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या.

आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे

माझ्यावरच्या आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाही, असा दावा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. आज नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्याविरोधात मतं टाकून अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, भाजप नगरसेवकांनी  तुकाराम मुंढे यांच्या बाजून मतदान केलं.

ठरावाची पुढील प्रक्रिया

हा अविश्वास ठराव आता नगरविकास खात्याकडे जाणार आहे. नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं आता ते यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महापौरांची मागणी

दरम्यान, आयुक्तांविरोधातला हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी दुसरा अधिकारी पाठवावा, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली आहे.

सेना-भाजपमध्ये जुंपली

तुकाराम मुंढेंविरोधातील प्रस्तावावरुन शिवेसना आणि भाजपत चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दडपणामुळे भाजपच्या 6 नगरसेवकांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचा आरोप सेनेनं केला आहे. तसंच या सगळ्यांचं ब्रेन मॅपिंग करण्याची मागणीही नामदेव भगत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या


आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर

आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे

राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी


सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण

‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव

…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे

तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!

नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम

नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई

तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन