आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 02:50 PM (IST)
नवी मुंबईः माझ्यावरच्या आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाही, असा दावा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. आज नवी मुंबई महापालिकेत नगरसेवकांनी आयुक्त मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानतंर मुंढेंनी आपली बाजू मांडली आहे. आपण कुठल्याही राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम करु, असं मुंढेंनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजने मतदान केलं. तर भाजपने मुंढेंच्या बाजूने मतदान केलं. संबंधित बातम्याः