मुंबई : विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकारवर 302 च्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे. त्यामुळे आता मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करायचा का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.


विधानपरिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

कर्जमाफी अजिबात नको, खात्यावर पैसे भरा: आ. प्रशांत बंब

अधिवेशन सुरु असताना साताऱ्यातील शेतकरी बंधूंनी सात लाखासाठी आत्महत्या केली. हा तातडीचा विषय आहे. दोन्ही सभागृहात कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. आपल्यापेक्षा निम्मं अर्थसंकल्प असलेलं उत्तर प्रदेशचं सरकार कर्जमाफी करु शकते, मग आपलं सरकार कर्जमाफी करु का शकत नाही? सरकार मध्ये संवेदना राहिलेल्या नाही, असंही राणे म्हणाले.

आम्ही सक्षम, हायकोर्टाने कर्जमाफीबद्दल सांगू नये : मुख्यमंत्री

तूरडाळीने निच्चांक गाठला आहे. ऊसाला दर नाही, कांदे-टोमॅटो रस्त्यावर फेकले जात असताना, योग्य वेळी कर्जमाफी करणार असं सरकार म्हणतं आहे. पण सरकार निवडणुकीची वाट पाहत आहे का? तोपर्यंत जेवढे शेतकरी आत्महत्या करतील त्याची जबाबदारी सरकार घेणार का?, असा सवालही राणेंनी विचारला.

विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर 320चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. आता मुख्यमंत्र्यांवरच 320 चा गुन्हा दाखल करायचा का, असं म्हणत राणेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

यूपीच्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी, योगी सरकारचा निर्णय