Nana Patole on Rahul Gandhi : काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे, याचा नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकार लोकशाही संपवण्याचं पाप करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सायंकाळी पाच वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची ही बैठक बोलवण्यात आली आहे.


''मोदी सरकार फक्त नीरव मोदी, ललित मोदी या मित्रांसाठीच''


मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत म्हटलं की, ''लोकसभा सचिवालयाचा निर्णय लोकशाहीविरोधात आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये मोदी सरकार त्यांच्या मित्रांसाठी... नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा लोकांसाठी... हे लोक जनतेचे हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाले. अशा लोकांना सपोर्ट करण्याचं काम भाजप आणि मोदींचं सरकार करतंय. त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचवतात. लोकसभेत त्यांना बोलू दिलं जात नाही. रस्त्यावरही बोलू देत नाही.'' असं म्हणत पटोले यांनी मोदी सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.


राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावर पटोलेंचा गंभीर आरोप


नाना पटोलं यांनी पुढे म्हटलं की, ''राहुल गांधींविरोधात गुजरातमध्ये खोटी तक्रार दाखल करत राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलं आहे. लोकशाहीविरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ठरवून करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं काम हे सरकार करतंय.'


याचा निषेध आम्ही विधानसभेत केला. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते, त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या अत्याचाराविरोधात बोलणाऱ्याचा फाशीची शिक्षा सुनावली जात होती. तसं भाजप वागतंय. कुणाला ईडी, सीबीआय लावायचं आणि धाकात ठेवायचं हा सरकारचा प्रयत्न आहे, असंही पटोले यांनी पुढे म्हटलं आहे.


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द - वाचा सविस्तर


सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई