नालासोपारा : नालासोपाऱ्यात पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. कॉन्स्टेबल पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिस अधिकारी असलेल्या पतीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार पतीचा पोलिस शोध घेत आहेत.
संबंधित पोलिस दाम्पत्याचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. तक्रारदार पत्नी हिंदू असून आरोपी पती मुस्लिम धर्मीय आहे. त्यांना दोन अपत्य आहेत. मोठा मुलगा आठ वर्षांचा आहे. मात्र घरगुती कारणांवरुन वाद निर्माण झाल्याने दोघं दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांचा कौटुंबिक वाद न्यायालयात सुरु आहे.
18 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता पती आपल्या घरी आला आणि नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याची बळजबरी केली, असा आरोप पत्नीने केला आहे.
पत्नीच्या तक्रारीवरुन नालासोपारा पोलिस ठाण्यात पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर फरार झालेल्या पतीचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2018 11:44 PM (IST)
कॉन्स्टेबल पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिस अधिकारी असलेल्या पतीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -