मुंबई : श्री नरसिंह के. दुबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातर्फे (Nalasopara Ayurvd Medical College and Hospital)दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. महाविद्यालयाचे संस्थापक कैलासवासी नरसिंह दुबे यांच्या पंधराव्या पुण्यस्मृती निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 


राज्यातल्या विविध महाविद्यालयातल्या 99 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातले 15 स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र झाले. अंतिम फेरी रविवारी कॉलेजमध्ये झाली.  मानसिक आरोग्य प्रथमोपचार : शारीरिक प्रथमोपचार इतकेच महत्वाचे, रियलिटी टेलिव्हिजन शोची वास्तविकता, स्व-चिकित्सा- हानी पोहोचवण्याचा मार्ग कि बरे होण्याची संधी?, किशोरवयीन आत्महत्या- उपाय नाही तर शोकांतिका हे चार विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. 


एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर अमित भिडे,  डॉ. रवींद्र देशपांडे,  एच एस एन सी विद्यापीठ, मुंबईचे  रिसर्च  मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. एम.ए. अन्सारी यांनी स्पर्धेचं परिक्षण केलं.  प्रथम पारितोषिक स्वरा सावंत, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय 10,000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक दिव्या पाटील,  नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज 7000/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक कृष्णा रामदास रामावत, विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज 5000 /- स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक सनी वर्मा,  भवन्स कॉलेज 3000/- स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. 




या स्पर्धांमधील विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दुबे आणि परीक्षक गणांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. याशिवाय  नि:शुल्क चिकित्सा शिबिर, सुदृढ बालक प्रतियोगिता,अन्नस्त्रोतावर आधारित वनौषधी प्रदर्शन, संभाषा  प्रतियोगिता इत्यादी विविध कार्यक्रमासोबतच विशुद्ध भोजपुरी, अवधी कवी संमेलनाचंही आयोजन करण्यात आलं होतं.




ही बातमी वाचा: