ठाणे : ठाण्याजवळील शीळमध्ये एका विवाहित जोडप्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंब्र्यातील डायघर पोलिसांनी अज्ञांतांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक उत्तरप्रदेशात रवाना झालं आहे.
उत्तर प्रदेशातील राहणारा अवघ्या 30 वर्षांचा तरूण विजय यादव आपल्या पत्नीसह डायघर येथे राहात होता. 15 तारखेला शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता, दोघही पती-पत्नी मृतावस्थेत आढळले.
विजय याचे सुफिया मन्सुरी हीच्याबरोबर प्रेम होते. सुफियाने धर्म बदलून विजयशी घरच्याना न सांगता लग्न केले आणि डायघरजवळ संसार थाटला. प्रिया ही गरोदर होती. अज्ञातांनी या दोघांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. दोन्ही मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाले होते. डायघर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बिहार निवडणक एक्झिट पोल 2025
(Source: Poll of Polls)
ठाण्यातील शीळमध्ये विवाहित जोडप्याची राहत्या घरी हत्या
एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Sep 2016 03:38 PM (IST)