नाच-गाण्यामुळे दाब येऊन पुलाचे आणखी नुकसान होऊ शकते. तसेच गणेश भक्तांनी पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये. त्यांनी शांतपणे पूल पार करावा अशा सूचनाही महापालिका प्रशासनाने सर्वच गणेश मंडळांना दिल्या आहेत. मुंबईत मागच्या काही काळात पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर सूचना दिल्या आहेत. या प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत मूर्तिकार आणि गणपती मंडळ यांनी देखील केले आहे.
यात सर्वात जास्त काळजी आणि शिस्त गिरणगाव आणि गिरगावातील मंडळांना घ्यावी लागणार आहे. कारण इथेच मोठे आणि गर्दी असलेले मंडळ आहेत. तसेच धोकादायक पूल देखील आहेत.
VIDEO | मुंबई पालिका, रेल्वेचे मिळून 34 धोकादायक पूल बंद | एबीपी माझा
मुंबईतील धोकादायक पूल
- वाकोला पाइप लाइन सर्व्हिस रोड पूल
- जुहू तारा रोड पूल
- धोबी घाट मजास नाला पूल
- मेघवाडी नाला पूल शामनगर अंधेरी
- वांद्रे-धारावी मिठी नदी पूल
- रतननगर-दौलतनगर पूल कांदिवली
- ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव पूल
- पिरामल नाला पूल लिंकरोड गोरेगाव
- चंदावडकर नाला पूल मालाड
- गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड पूल
- प्रेमसागर नाला एसव्ही रोड पूल मालाड
- फॅक्ट्री लेन बोरिवली पूल
- कन्नमवारनगर घाटकोपर
- लक्ष्मीबाग नाला पूल घाटकोपर
- नीलकंठ नाला घाटकोपर
मुंबईतल्या धोकादायक झालेल्या पुलांचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार यांनीं सर्व्हे करुन यादी निश्चित केली. त्या पुलांचे पाडकाम देखील सुरु केले आहे. मात्र पावसाळ्या नंतर ते काम सुरु होईल. तोपर्यंत या सणासुदीच्या मुख्यतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.
Chintamani Aagman | चिंतामणी आगमन सोहळ्यात टवाळखोरांचा धिंगाणा | मुंबई | ABP Majha