लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत राष्ट्रवादीकडून त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. याच कारणांमुळे खासदार भारती पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली होती. मात्र धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळेचं महाले यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. तसेच ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्ष सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली होती.