मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. धारावी, दादर आणि माहिमला मागे टाकत अंधेरी पूर्व, जोगेश्वरी विभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं के पूर्व वॉर्ड मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरतोय. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व वॉर्डात मुंबईतील सर्वाधिक 3 हजार 782 रुग्ण आढळून आलेत. कालपर्यंत दादर, धारावी आणि माहिमचा समावेश असलेला जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, काल एका दिवसात अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये 166 नवे रुग्ण आढळले आहेत.


आता पर्यंत धारावी-दादर-माहिमचा समावेश असलेला मुंबईतील मोठा हॉटस्पॉट जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण असल्याने प्रथम क्रमांकावर होता. मात्र, काल एका दिवसात अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये 166 नवे रुग्ण आढळल्याने अंधेरी पूर्व आणि जोगेश्ववरीचा समावेश असणारा के पूर्व विभाग आता प्रथम क्रमांकावर आला आहे.


मुंबईतील 6 विभागांत 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या


के पूर्व ( अंधेरी, जोगेश्वरी) - 3782
जी नॉर्थ (धारावी, माहिम, दादर) - 3729
एल वॉर्ड (कुर्ला)- 3373
ई वॉर्ड (भायखळा, मुंबई सेंट्रल)- 3144
के पश्चिम (अंधेरी पश्चिम)- 3138
एफ नॉर्थ (माटुंगा, वडाळा) - 3111


अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेला के ईस्ट वॉर्ड कोरोना रुग्णसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर कसा पोहोचला?




  • के पूर्व हा मुंबईतील तीसरा मोठा वॉर्ड आहे. ज्या ठिकाणी 70 टक्के परिसर झोपडपट्टीनं व्यापलेला आहे. नियमाप्रमाणे तेथील हाय रिस्क कॉन्टॅक्टचं विलगीकरण करण्यात येत आहे.

  • या ठिकाणचे अनेक रुग्ण त्यावश्यक सेवांमधील म्हणजे एमआयडीसी , सिप्झ, एअरपोर्ट, मरोळ पोलिस कॅम्प, सेव्हन हिल्स आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटल या ठिकाणचे आहेत.

  • हा वॉर्ड एअरपोर्टच्या जवळचा आहे. त्यामुळे वंदे भारत मिशन अंतर्गत जे प्रवासी आले ते याच वॉर्डातील हॉटेल्स मध्ये राहिले. या वॉर्डमध्ये क्वारंटाईन केलेले 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

  • या ठिकाणी असणारी अनेक अत्यावश्यक सेवांची कार्यालये, वृत्तवाहिन्या यांच्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Police #Corona | मुंबईनं 88 दिवसात 91 कोविड वॉरियर्स गमावले,एकाच दिवसात चार मुंबई पोलिसांचा मृत्यू