मुंबई : मुंबईच्या अंधेरी स्टेशन परिसरात तिकीट काढण्यासाठी उभ्या असणाऱ्या 56 वर्षीय महिलेवर अचानक  स्लॅब कोसळला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.


आशा मोरे असं जखमी महिलेचं नाव असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडले आहे. स्लॅब कोसळल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ रेल्वेच्या अॅम्ब्युनलन्समधून कुपर रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून आशा मोरे यांना अवघ्या 500 रुपयांची मदत देण्यात आली. डोक्याच्या दुखापतीवर 500 रुपयांमध्ये उपचार कसे होणार, असा प्रश्न आशा मोरे यांच्या नातेवाईकाने विचारला आहे.

पण स्लॅबचा तुकडा छोटासा असला तरी रेल्वेच्या कारभार पुन्हा या घटनेने समोर आला आहे.