मुंबई : राजस्थानमधून 21 कोटीची ड्रग्ज (Drugs) तस्करी करणाऱ्या महिलेला  अंमली पदार्थ विभाग घाटकोपर युनिटने अटक केली आहे. अमीना हमजा शेख (वय 53) असे या महिलेचे नाव असून हिच्याकडून पोलिसांनी 21 कोटी 60 लाखाचे ड्रग्ज जप्त केले आहे. न्यायालयाने या आरोपी महिलेला 25 ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती गुन्हे शाखा अंमली पदार्थ विभागाच्या घाटकोपर युनिटच्या पोलिस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. हा ड्रग्जचा व्यवहार सायन कोळीवाडा येथील  वडाळा  टर्मिनल येथे होणार असल्याने पोलिसांना सापळा रचला होता.


Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणावर बऱ्याच काळानंतर ट्विंकल खन्नाने मौन सोडले; स्क्विड गेमशी तुलना


या ड्रग्जचा व्यवहार करण्यासाठी येणारे तस्कर मुंबईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना हे ड्रग्ज विकणार होते.  या वेळी अमीन हमजा शेख उर्फ लाली हिला रंगेहाथ पोलिसांनी अटक केली. लाली ही सराईत आरोपी असून ती मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊडमध्ये राहते.  पोलिसांनी तिच्याकडून 7 किलो 200 ग्रॅम हेरॉईन ताब्यात घेतले. या ड्रग्जची बाजारात किंमत 21 लाख 60 लाख इतकी आहे.


Aryan Khan Chat Leak : बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अंमली पदार्थांबाबत चॅट करत होता आर्यन खान; NCB च्या हाती चॅट


हे ड्रग्ज तिने राजस्थानच्या देवलाई, नौगामा येथून मागवले होते. हेरॉईनची तस्करी करणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांची नावे लालीच्या चौकशीत समोर आली आहेत.  विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने चालू वर्षात हिरोईन तस्करीच्या 8 मोठ्या कारवाई केल्या असून त्यात 9 जणांना अटक केली आहे. यातील तीन आरोपी हे राजस्थानचे मोठे ड्रग्ज पुरवठादार आहेत. या तिघांकडून पोलिसांनी 16 किलो हिरोईन जप्त केले होते. ज्याची बाजारात किंमत 44 कोटी इतकी आहे.   या कारवाईवरून राजस्थान हे तस्करांचे मोठे केंद्र असल्याचे समोर येतअसूनही ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने कंबर कसली आहे.