Aryan Khan Case: अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणी बऱ्याच काळानंतर आपले मौन सोडले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना ट्विंकलने या प्रकरणाची तुलना नेटफ्लिक्सच्या (Netflix) वेब सीरिज स्क्विड गेमशी (Squid Game) केली. ट्विंकलने आर्यनबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर अक्षय कुमारने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आर्यनवर ट्विंकलने मौन सोडले
गेल्या काही काळापासून नेटफ्लिक्सच्या वेबसीरीज स्क्विड गेमबद्दल बरीच चर्चा झाली आहे. ही एक कोरियन वेबसिरीज आहे, ज्यात काही लोकांना अडकवून गेम खेळला जातो. त्यांना गेम जिंकण्यासाठी अनेक टास्क दिले जातात. टास्क हारणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जातो. ट्विंकलने आर्यन खानला त्याच्या पोस्टमध्ये मार्बल खेळाचा हवाला देत प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "प्रत्येक खेळाडूला जिंकण्यासाठी 10 मार्बल दिले जातात आणि त्यांना इतर स्पर्धकांकडून स्पर्धा जिंकून त्यांचे मार्बल मिळवावे लागतात. या भागात, बलवान माणसाला सर्व प्रकारे पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे तो आपले मार्बल हारतो. जेव्हा मी शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेची बातमी वाचली, तेव्हा मला वाटले की माझे मार्बल देखील हरवले आहेत. "ट्विंकलने पुढे लिहिले," त्याचा मित्र 6 ग्रॅम चरस घेऊन जात होता. परंतु, कथितपणे आर्यनकडून काहीही सापडले नाही. तरीही त्याला दोन आठवडे आर्थरमध्ये ठेवण्यात आलं आहे.
बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी आर्यन खानच्या संदर्भात शाहरुखचे समर्थन केले आहे. अलीकडेच गीतकार जावेद अख्तर यांनीही शाहरुखला पाठिंबा दिला. याआधी अभिनेता सलमान खान, हृतिक रोशन, सुनील शेट्टी, पूजा भट्ट, सुझान खान, प्रल्हाद कक्कर यासारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला आहे.