मुंबई : मुंबईतील पश्चिम उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Cut) करण्यात आला आहे. 27 आणि 28 मे रोजी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही भागात पाणी नसणार आहे. जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे 24 तासा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय.
मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा होण्यासाठी पी उत्तर विभागात मार्वे मार्गावरील जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. सोमवार (27 मे) रोजी रात्री 10 पासून ते मंगळवार (28 मे) रात्री 10 पर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार (27 मे) रोजी रात्री 10 पासून ते मंगळवार (28 मे) रात्री 10 वाजेपर्यंत पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे , असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
जलवाहिनी बदलण्याच्या काम मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज ते ब्ल्यू हेवेन हॉटेल, मार्वे मार्ग, मालाड पश्चिम, पी उत्तर विभागापर्यंत मार्वे रस्त्यालगत असलेली जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या कामतानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यास मदत होणार आहे. एकंदरीतच मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
खालील भागातील पाणीपुरवठा बंद
- पी उत्तर विभाग- अंबोजवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 11.30 ते मध्य रात्रीनंतर 12.35 ) 27 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- पी उत्तर- आजमी नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 12 ते मध्यरात्रीनंतर 1.30 ) 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- पी उत्तर विभाग- जनकल्याण नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 1.30 ते मध्यरात्रीनंतर 3) – 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- पी उत्तर विभाग- मालवणी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 8 ते सकाळी 11.50) – 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- पी उत्तर विभाग- अली तलाव मार्ग, गावदेवी मार्ग, इनासवाडी, खारोडी, राठोडी गाव, मालवणी गाव, खारोडी गाव, मनोरी, पटेलवाडी, शंकरवाडी, मार्वे गाव, मढ क्षेत्र, मनोरी गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 4.20 ते रात्री 10 ) –28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- आर दक्षिण विभाग- छत्रपती शिवाजी महाराज संकूल, न्यू म्हाडा ले आऊट (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर 1.30 ते मध्यरात्रीनंतर 3) – 28 मे पाणीपुरवठा बंद राहील.
- आर मध्य विभाग- गोराई गाव, बोरिवली (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30) – 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
हे ही वाचा :