मुंबई : मुंबईतील काही भागात पुढील 24 तास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महापालिकेकडून मरोळ-मरोशीपासून माहीम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतच्या जलबोगद्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.


शुक्रवार 7 जुलै, 2017 रोजी सकाळी दहापासून शनिवार 8 जुलै, 2017 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा 24 तास बंद असेल.

विभाग आणि पाणी पुरवठयात परिणाम होणारे क्षेत्र

सूचना 1

शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

ए विभाग : कफ परेड, नरिमन पॉईंट, बँकबे, फोर्ट, बॅलार्ड पिअर, कुलाबा, मिलिटरी, नेव्ही, बोरीबंदर/साबुसिद्दीक क्षेत्र,

सी विभाग : बँकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, ई आणि एस रोड)

डी विभाग : लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग, नेपियन्सी रोड, कारमायकल/अल्टामाऊंट रोड, ताडदेव क्षेत्र (तुलसीवाडी, आर्थर रोड, जावजी दादाजी रोड), मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन क्षेत्र

जी/उत्तर विभाग : सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल.जे. रोड, एस.व्ही.एस. रोड, टि.एच.कटारीया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, एन.सी.केळकर रोड, एस.के.बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग

जी/दक्षिण विभाग : सिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी. चाळ एन.एम.जोशी मार्ग, ए.बी. रोड, सेनापती बापट रोड, एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळी कोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, बुद्ध टेम्पल, अहुजा सप्लाय आणि ९०० मि.मी. व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी येथील बी.डी.डी. चाळी)

एच/पश्चिम विभाग : पेरी रोड, चॅपल रोड, बी.जे.रोड, खारदांडा, आंबेडकर रोड, माऊंट मेरी, पाली माला रोड आणि युनियन पार्क क्षेत्र

तर ई विभाग :  नायर आणि कस्तुरबा हॉस्पिटल
या भागात शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

---------
शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

सूचना : 2

ए विभाग : पास्ता लेन क्षेत्र

सी विभाग : काळबादेवी क्षेत्र (काळबादेवी रोड, भुलेश्वर मार्ग, फणसवाडी, जे. एस.एस. रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, ब्रिगेडीयर उस्मान मार्ग), मुंबई सेंट्रल क्षेत्र (सरदार वल्लरभभाई पटेल मार्ग, मौलाना आझाद रोड), आणि ठाकुरद्वार रोड क्षेत्र (कावासजी पटेल टँक रोड, कारपेंटर मार्ग)

डी विभाग : मुंबई सेंट्रल क्षेत्र (अलीभाई प्रेमजी मार्ग, आर.एस.निमकर मार्ग, पठ्ठे बापुराव मार्ग, खेतवाडी रोड), ठाकुरद्वार रोड क्षेत्र (विठ्ठलभाई पटेल रोड, खाडीलकर रोड), गिरगाव क्षेत्र (गावदेवी रोड, बाबुलनाथ रोड, सिताराम पालकर मार्ग, नेताजी सुभाष रोड, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग), एम.पी.मिल कम्पाऊन्ड, वाळकेश्वर रोड क्षेत्र (बाणगंगा रोड), सिरी रोड, फॉर्जेट हिल रोड, फॉर्जेट स्ट्रिट क्षेत्र

ई विभाग : मुंबई सेंट्रल क्षेत्र (मदनपुरा, आग्रीपाडा, केशवराव खाडे रोड, बी.जे.रोड, सांखळी रोड, साने गुरुजी मार्ग, नागपाडा)

जी/दक्षिण विभाग : क्लार्क रोड, सखुबाई मोहिते मार्ग, जिजामाता नगर, डि.सी. रोड आणि ७५० मि.मी. व्यासाची वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र

एच/पश्चिम विभाग : रिक्लमेशन, बाजार रोड, दिलीप कुमार परिमंडळ (पाली हिल, खारदांडा इत्याचदी), कोलडोंगरी, झिकझॅक रोड क्षेत्र

तर बी विभाग : डोंगरी ‘बी’ क्षेत्र (नरसिनाथ मार्ग,अब्दुल रहमान मार्ग, युसुफ मेहेरअली रोड, नागदेवी रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, मौलाना शौकत अली रोड, मोहम्मद अली रोड)

एच/पश्चिम विभाग : जनरल क्षेत्र या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान या जलबोगद्याच्या कामानंतर मुंबईकरांना चांगली सेवा देण्यात येईल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.