मुंबई : मुंबईतून मान्सून (Mumbai Monsoon) दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कारण मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे (Mumbai Water Shortage) संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.1 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरुच आहे.
मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. पावसाची हुलकावणी, वाढलेला उष्मा आणि पाण्याची मागणी आणि तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाण्याची पातळी घटली आहे. सध्या मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
कोणत्या जलाशयात किती पाणीसाठा उपलब्ध?
- अप्पर वैतरणा -0 टक्के
- मोडक सागर - 15.73 टक्के
- तानसा - 22.05 टक्के
- मध्य वैतरणा - 9.64 टक्के
- भातसा - 0 टक्के
- विहार - 17.92 टक्के
- तुळसी- 24.46 टक्के
आज जलाशयात म्हणून एकूण 77851 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे.
राज्यात ऊन-पावसाचा खेळ
राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासू दांडी मारली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायब झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात मघेगर्नजसेह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C च्या आसपास असेल.
हे ही वाचा :
Mumbai Water Cut: शॉवर वापरु नका, दाढी करणे टाळा; पालिकेकडून मुंबईत पाणीकपात जाहीर, या तारखेपासून अंमलबजावणी