Vasai Virar Rain Update : वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग दुस-या दिवशी पावसाने संपूर्ण हाहाकार माजवला आहे.  मध्यरात्री थोडी विश्रांती घेतल्यावर सकाळपासून पडणाऱ्या  मुसळधार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यावर  पाणीच पाणी झाले होते. तयामुळे पूर्ण परिसर जलमय झाला होता. वसई विरार क्षेञात दुपारपर्यंत २६८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.


वसई विरार, नालासोपाऱ्याला पावसाने अक्षरशः धुवून काढले आहे. रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरूप आलं होतं. शहरातील सकल भागातील मुख्य रस्ते, अद्यौगिक वसाहतीत गुडगाभर, पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळपर्यंत तरी रस्त्यावर साचलेले पाणी ओसारलेच नसल्याने नागरिकांचे वाहनचालकांचे अतोनात हाल झाले.  वसई पूर्व एव्हरशाईन, वसंत नगरी येथे रस्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच पाणी ओसरलं होतं. मात्र काल वाहतूक कोंडीचा अनुभव आल्याने वाहनचालकांनी महामार्गावरुन प्रवास करणं टाळलं. माञ खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती.  पालिकेनेही आज काही ठिकाणी जेवणाचे पॅकेट, औषधे वाटप केली. 


नालासोपारा पूर्व पश्चिम स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, प्रगतीनगर, ओसवाल नागरी, मोरेगाव, आचोले रोड, शिर्डी नगर, संतोष भुवन, बिलालपाडा, धाणीवबाग,  वसई पूर्व एव्हरशाईन, वसंत नगरी, सातीवली, नवजीवन, भोयदापाडा, गोखीवरे, वसई पश्चिम स्टेशन परिसर ,ओम नगर,  गोकुळ आंगण, कृष्णा टाउनशिप, माणिकपूर रोड, चुलने, गास, सनसिटी, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, बोलींज, गावठाण, यशवंत नगर, विराट नगर, विरार पूर्व विवा जहांगीड हा सर्व परिसर आजही  जलमय झाला होता.


वसईच्या मिठागरमध्येही  पालिकेने खबारदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. तर वसईचा सनसिटी रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. एक बस सकाळी बंद पडल्याने २० ते २५ नागरीकांना पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सखरुप बाहेर काढले. त्यातील एका अंपगाला तर अग्निशमन दलाच्या जवानांनी खांद्यावर उचलून नेलं होतं. तर विरारच्या अर्नाळा गावातील आदिवासी पाड्या दोन दिवसापासून पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, घरात पाणी शिरलं आहे.  प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे तहसिल आणि ग्रामपंचायती विरोधात स्थानिक नागरीक चक्क पूराच्या पाण्यात उतरुन धरणे आंदोलन केलं आहे.