Amaranth Yatra : यंदाची अमरनाथ यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून याबाबत  माहिती देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.


जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी अमरनाथ श्राइन बोर्डासोबत यात्रेसंदर्भात बैठक घेतली. या भेटीबद्दल राज्यपाल कार्यालयाने ट्विटरवरून माहिती दिली आहे. "श्री अमरनाथ यात्रा श्राइन बोर्डासोबत आज बैठक पार पडली. 43 दिवस चालणारी अमरनाथची ही पवित्र यात्रा कोरोनाचे सर्व नियम पाळून 30 जूनपासून सुरू होईल.  परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे." असे ट्विट राज्यपाल कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 






अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने नुकतीच याची घोषणा केली आहे. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. एका दिवसात केवळ 20 हजार नोंदणी होणार असल्याचे श्राइन बोर्डाचे म्हणणे आहे. याशिवाय प्रवासाच्या दिवशी काउंटरवर जाऊनही नोंदणी करता येते, असी माहिती श्राइन बोर्डाने दिली आहे. श्राइन बोर्डाने सांगितले की, "दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या माहितीसाठी आरएफआयडी आधारित ट्रॅकिंग केले जाईल."


दरम्यान, देशातील कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली होती. सलग दोन वर्षी यात्रा रद्द करण्यात आल्यानंतर यंदाही या यात्रेवर कोरोनाचे थोड्याफार प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोना नियामांचे पालन करणे बंधनकारत असल्याचे श्राइन बोर्डाने म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या


Rule Change: एक एप्रिलपासून बदलणार हे 10 मोठे नियम, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान


मला उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस! : चंद्रकांत पाटील