मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आगामी सीनेट निवडणुकीसाठी (Sinate Election) मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व आहे. त्यालाच धक्का लावण्याचा चंग अमित ठाकरेंनी बांधल्याचं बोललं जातंय.
दरम्यान आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची सीनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. सिनेट निवडणुकीत सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
मागील पदवीधर सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता युवासेना सुद्धा दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 2 माजी सिनेट सदस्य हे शिंदे गटात आहेत. येणाऱ्या सिनेट निवडणुका पाहता सर्व पक्षांनी संघटनांनी आपली तयारी सुरू केली आहे. मतदार नोंदणीवर अधिकाधिक व्हावी यासाठी भर दिला जात आहे.
ठाकरेंची युवा सेना सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागांवर उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाच्या युवा सेनेने आपली रणनीती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवाय या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस, छात्र भारती हे समविचारी पक्षाची साथ देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सिनेट निवडणुकीची चुरस आणखी वाढलेली पाहायला मिळत आहे. भाजप आणि मनसेच्या विद्यार्थी संघटनेची ताकद मोठी आहे.
सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होईल सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे त्यामुळे सिनेट निवडणुकीत हे तिघंही मोठं ताकदीनं उतरताना दिसतील.
संबंधित बातम्या :