मुंबई: युवा सेनेच्या (Yuva Sena) पदाधिकाऱ्यांवर याआधीच अनेक आरोप झाले आहोत आता सिनेट निवडणुकांवरून देखील आरोप प्रत्यारोप  सुरू आहेत.  सिनेटचे (Mumbai University Senate Election) मतदार होताना 20 रुपयांची फी भरणे गरजचेचं असते अशा 40 हजार विद्यार्थ्यांचे पैसे युवा सेनेनं दोन खात्यावरून भरले आहेत पण ही दोन नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. योग्य वेळ आल्यावर नावं बाहेर काढू असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 


सिनेटवरून सध्या राजकारण सुरु झाले आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू  आहेत पण सिनेटचा मुद्दा आता भलताच गाजलाय तो म्हणजे सिनेट सदस्यांचे पैशांवरुन.... एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या राहुल कनाल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 


नोंदणीची फी सेनाभवनातून भरल्याचा आरोप राहुल कनाल यांचा आरोप


सिनेट निवडणुकांच्या आधी पदवीधर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. या निवडणुकीत युवा सेनेकडून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली आहे. एका विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करताना 20 रुपये ॲानलाईन भरावे लागतात. या नोंदणीची फी सेना भवनातून भरल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला आहे.  विद्यार्थ्यांची फी ही त्यांच्या अकाऊंटवरून भरली गेली पाहिजे, पण सेनाभवनच्या दोन अकाऊंटवरून पैसै भरले गेले आहेत. सिनेटच्या निवडणुकीत विद्यार्थ्याचं पैसै दोन प्रायव्हेट अकाऊंटवरून भरण्यात आले आहे. 


आठ लाखांच्या देवाणघेवणीवर आता प्रश्नचिन्ह


युवा सेनेकडून 40 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे. म्हणजे 40 हजार विद्यार्थ्यांचे 20 रुपयांनी एकूण आठ लाख रुपये होतात.  या आठ लाखांच्या देवाणघेवणीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय  सिनेट निवडणुकीत सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे. या सदस्य नोंदणीवरच या निवडणुकांचं भवितव्य असतं. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणीकडे सर्वांचे लक्ष असते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, अभाविप, मनविसे आणि भाजपने सदस्य नोंदणीसाठी कार्यक्रम आखले गेले. मागील वर्षी मुंबई विद्यापीठाच्या 10 सिनेट सदस्यांसाठी 65 हजार सदस्य नोंदणी झालेल्या मतदारांना, मतदानाचा हक्क बजावता आला होता.  


मुंबई महानगरपालिका ठाकरेंसाठी सोपी नसणार 


सिनेटच्या निवडणुकीवर ज्यांची सत्ता त्यांच्यासोबत मुंबईतली युवाशक्ती असं जवळपास समीकरण बनलं आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर  ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे. 


सिनेटचं प्रकरण गाजणार 


कोविड घोटाळा, एसआरए घोटाळा, रस्ते घोटाळ्यांसह विविध प्रकरणात ठाकरेंचे नेते पदाधिकारी अडकले आहेत त्यात आता सिनेटच्या नोंदणीवरून गोंधळ सुरु झाला आहे.  या सदस्यांच्या नोंदणीत बोगस नावं ॲड झाल्यामुळे विद्यापीठाकडून निवडणुका रद्द करण्यात आली आहे.  त्यात आता या सदस्यांचं फी प्रकरण नवं बाहेर येतंय या सगळ्यांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे सिनेटचं प्रकरण आता अजून गाजणार आहे.  


हे ही वाचा :