मुंबई : मुंबईत मंगळवारी पडलेला तुफान पाऊस आणि गणेशोत्सवामुळे परीक्षांचे पूर्ण निकाल लावता आले नाहीत, असा अजब दावा मुंबई विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात केला आहे. आता विद्यापीठाने तब्बल सहाव्यांदा डेडलाईन बदलत 6 सप्टेंबर अशी नवी डेडलाईन ठेवली आहे.


निकाल जाहीर करण्याची 31 ऑगस्टची डेडलाईनही हुकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठावर नाराजी व्यक्त केली. पण मुंबई विद्यापीठाने आज नवी डेडलाईन हायकोर्टात सादर केली.

मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे उपनगरात अनेक ठिकाणी वीज गेली होती आणि त्यामुळे पेपर तपासणीचं काम पूर्ण करता आलं नाही, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. तसंच सध्या गणोशोत्सव सुरु असल्यामुळेदेखील पेपर तपासणीस विलंब झाला असल्याची माहिती विद्यापीठानं हायकोर्टानं दिली आहे.

तसंच मुसळधार पावसाने इंटरनेट सेवाही खंडित झाली होती, त्यामुळे तपासणी पूर्ण झालेल्या पेपरचे गुण विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकता आले नाही. आता महाविद्यालयांना निकालाचे गॅझेट पाठवून त्याद्वारे निकाल पोहोचले जातील, असंही विद्यापीठानं कोर्टाला सांगितलं आहे.

दरम्यान, रखडलेल्या निकालामुळे लॉसीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आता मुंबई हायकोर्टाने 6 सप्टेंबर केली आहे.

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा