Mumbai Traffic Updates: मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western Express Highway) प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Updates) झाली आहे. सकाळपासून ही वाहतूक कोंडी झाली आहे. मालाड कुरारपासून (Malad) ते जोगेश्वरी (Jogeshwari) दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. या दरम्यानच्या काही भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. तर, काही भागांमध्ये वाहनांची रहदारी संथगतीने सुरू आहे. सकाळीच झालेल्या या वाहतूक कोंडीने सामान्यांना कामावर लेट मार्क लागला आहे.
 
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा वर्दळीचा मार्ग आहे. विलेपार्ले, दादर, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदार, सामान्यांची  संख्या मोठी असते. या महामार्गालगत मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, आज मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगाव येथील विरवाणी इस्टेटपासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालयापर्यंतच्या सिग्लपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकले आहेत. बेस्ट बसेस, रिक्षादेखील वाहतूक कोंडीत अडकल्याने सामान्यांना त्याचा फटका बसला आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे म्हटले जात आहे.


नाहक त्रास


रविवारच्या सुट्टीनंतर आज कामावर जाणाऱ्यांचे या वाहतूक कोंडीने हाल होत आहेत.  मेट्रो संबंधी कामे करण्यासाठी रात्रीची वेळ अथवा वाहतुकीचे नियोजन करून  करण्यात यावे अशी मागणी सातत्याने वाहन चालकांकडून करण्यात येते. वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक कोंडीने चालक त्रस्त असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. 


 










 


इतर महत्त्वाच्या बातम्या: