मुंबईच्या कामाठीपुरात इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2016 10:20 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात तीन मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. कामाठीपुरात आज चौदाव्या गल्लीतील या तीन इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. मात्र काम सुरु असतानाच इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अग्निशनम दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.