मुंबई : मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने टॅक्सीची भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना आपल्या मागण्यांबाबतचं पत्र लिहलं आहे.


मुंबईत टॅक्सीचे भाडे सध्या 22 रुपये प्रति दीड किमी आहे ते 30 रुपये प्रति दीड किमी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.


मुंबईत जवळपास 50 हजार काळी-पिवळी टॅक्सी चालक आहेत. 2015 पासून काळी-पिवळी टॅक्सीच्या भाड्यात कोणतेही भाडेवाढ झालेली नाही. त्या तुलनेत 2015 पासून जवळपास साडेनऊ रुपयांनी सीएनजीचे भाव वाढले आहेत.


त्यामुळे सद्यस्थितीतील भाडे हे परवडणारे नसून भाडेवाढ व्हावी ,अशी मागणी मागील काही वर्षांपासून टॅक्सी मेन्स युनियन करत आहे. जर भाडेवाढीची मागणी सरकारकडून मान्य झाली नाही, तर मुंबई टॅक्सी मेन्स युनियन आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे भाडेवाढ झाली तर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.